पक्षाची घरघर घालविण्यासाठी मोफत घर

अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला चाप लाऊन आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे पानिपत करण्यासाठी काँग्रेसने गुजरातमधील गरिबांना मोफत घरे वाटण्याची घोषणा केली आहे. या योजनेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल २८ लाख अर्जांचे वाटप करण्यात आले आहे.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीला दि. २० ओगस्ट रोजी गुजरात कॉंग्रेसने ‘घर नू घर’ या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील गरीब महिलांना घरे देण्यात येणार आहेत. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी लाखो लोकांची गर्दी जमली. अनेक ठिकाणी त्यासाठी हाणामारीचे प्रकारही घडले.

मात्र या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Comment