आता नेहा धुपिया झाली आयटम गर्ल

नेहा धुपियाने यापूर्वी कित्येकवेळा सिनेमातून आणि स्टेजवर डान्स केला आहे. त्यामुळे तिचा डान्स हा आता काही नवखा रहिला नाही. दिग्दर्शक तिग्माशु धुलिया याच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमामध्ये ती आयटम सॉंगवर थिरकणार आहे.

या सिनेमामध्ये इम्रान खान, जेमी शेरीगील, सोहा अली खान व माही गिल सारखी कलाकार मंडळी असतानाही नेहा धुपिया आयटम सॉंग करणार आहे. या सिनेमाचे निर्माता राहुल मित्तल म्हणाले, ‘नेहा ही एक चांगली डान्सर आहे. पहिल्यांदाच ती या सिनेमाद्वारे आयटम सॉंग करणार आहे. या सिनेमाचे शूट सध्या गुजरातमधील वडोदरा येते सुरु आहे. आयटम सॉंग मात्र पुढच्या महिन्यात जयपूरमध्ये शूट केले जाणार आहे.’

फिल्म मेकर्स या आयटम सॉंगला सध्या बी टाउन टच देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सिनेमाचे म्युजिक संदीप चोटा व कौसर मुनीर यांनी कॉम्पोझ केले आहे. यापूर्वी नेहाने २००८ साली ‘कभी प्यार ना करना’ या पाकिस्तानी सिनेमामध्ये आयटम सॉंग केले होते. या सिनेमामध्ये तिच्या सोबत मुआर राना, जारा शेख व विना मलिकने रोल केला होता.