सोनाक्षीचे नखरे वाढले

इंडस्ट्रीजमध्ये आल्यानंतर लगेचच यश मिळाले तर कलाकार मंडळीचा भाव लगेचच वधारतो. अल्पावधीतच यश मिळाले की या मंडळीचे नखरे वाढतात, तसेच आता बॉलिवूड मध्ये दबंग सिनेमाद्वारे एन्ट्री करणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे झाले आहे. सध्या तिचे नखरे एवढे वाढले आहेत की, केवळ कपडे पसंत नाहीत म्हणून तिने सिनेमा नाकारला आहे. सोनाक्षीने एकता कपूरचा ‘मिलन टॉकीज’ हा अपकमिंग सिनेमा नाकारला आहे.

यामधील इंडियन लुकचे कपडे आवडले नसल्याने हा सिनेमा सोडला असल्याचे सोनाक्षीने स्पष्ट केले आहे. सोनाक्षी या सिनेमामध्ये इम्रान खान सोबत मेन रोल करणार होती. इंडियन लुकचे कपडे तिला या सिनेमासाठी कम्फटेबल वाटत नसल्याच्या कारणावरून तिने हा सिनेमा सोडला आहे.

एकता कपूरच्या प्रोडक्शन होऊसचे सीईओ तरुण गर्क म्हणाले, ‘ या सिनेमासाठी आतापर्यंत आम्ही इम्रान खानलाच फायनल केले आहे. त्यशिवाय इतर कलाकाराची निवड केली जात असून त्याचाशिवाय कुणालाच फायनल केले नाही. सोनाक्षी सिन्हाकडे केवळ विचारणा करण्यात आली आहे. अजून तिचा होकार आला नसल्याने तिच्या नाव अजून तरी फायनल केलेले नाही.’ या सिनेमाचे शूट वर्षाअखेरीस सुरु होणार आहे.

Leave a Comment