सरकारला कुपोषणविरोधी मोहिमेसाठी अमीरची ’डेट’ मिळेना!

नवी दिल्ली,२२ ऑगस्ट-सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणार्‍या बॉलिवूड अभिनेता अमीरच्या ’ सत्यमेव जयते’ मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर सरकारनेही कुपोषणविरोधी मोहिम राबवण्यासाठी आमीरलाच ब्रँडअॅम्बेसिटर बनवले. त्याच्या लाँचिंगसाठी सरकारने अमीरकडे अनेकदा डेटस मागितल्या. मात्र शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने अमीरने सरकारला वेटिंगवर ठेवले आहे.

महिला आणि बालविकास मंत्रालयाने अमीर बाल कुपोषणाच्या विरोधात ’ कुपोषण – देश छोडो ’ हे अभियान चालवण्यासाठी ब्रँडअॅम्बेसिटर बनवले आहे. देशभरात कुपोषणाविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. पण हे अभियान सुरू करण्याचा सरकारला मुहुर्तच मिळत नाही. कारण अमीर शूटिंगसाठी सध्या विदेशात असून प्रचंड व्यस्त आहे आणि हे अभियान सुरू करण्यासाठी डेटस मागवल्यानंतरही तो सरकारला डेटसही देत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या अभियानाची संकल्पना अमीर खानचीच आहे. ’सत्यमेव जयते ’ सुरू असताना मोठा गाजावाजा करत त्यानेच या संदर्भातील एक पत्र महिला बाल कल्याण मंत्रालयासोबत पीएमओकडे पाठवले होते. पंतप्रधानांनीदेखिल या अभियानात विशेष रुची घेतली आहे. अमीर जर डेटस देणार नसेल तर आता मंत्रालयच अमीरला डेटस पाठवण्याची तयारी करते आहे. तसेच अमीरही पंतप्रधानांनी बोलवणे पाठवण्याची वाट पाहतो आहे. त्यामुळे जोपर्यंत अमीरला पंतप्रधान कार्यालयाकडून बोलवणे तो येत नाही तोपर्यंत अमीर या अभियानाकडे फिरकणार नाही, अशी चर्चा सुरू आहे.

Leave a Comment