नवी दिल्ली दि.१७- राष्ट्रपतीपदावर नुकतेच विराजमान झालेल्या प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रपतीभवनात इफ्तार मेजवानीचे आयोजन केले असून उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यासाठी खास निमंत्रण दिले आहे

राष्ट्रपतीभवनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजे १७ ऑगस्टला जमात उल विदा म्हणजे रमझानचा शेवटचा शुक्रवार आहे. त्यानिमित्त ही मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. या मेजवानीसाठी माजी राष्ट्रपतींना, तसेच इस्लामिक देशातील राजकीय प्रतिनिधी, मंत्री,खासदार, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, राजकीय नेते तसेच कांही वरीष्ठ अधिकारी व अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तीनाही आमंत्रण देण्यात आले आहे. प्रणवदांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिलीच इफ्तार पार्टी राष्ट्रपतीभवनात होत आहे.