इस्लामाबाद: पाकिस्तानी हवाई दलाच्या कामरा येथील तळावर दहशतवाद्यांनी गुरुवारी पहाटे सुरक्षा दलाच्या गणवेशात हल्ला चढविला. या हल्ल्याला पाकिस्तानी विशेष कमांडो पथकाने दिलेल्या प्रत्युत्तरात ६ दहशतवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचे ६ जवान जखमी झाले.

पाकिस्तानातून जगभर दहशतवादी कारवाया करणार्या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी पाक लष्कर कठोर पावले उचलेल असे संकेत लष्करप्रमुख जनरल अशपाक परवेझ कयानी यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्करी दलांपुढे केलेल्या भाषणात दिले. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविला आहे.
गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास लष्करी जवानांच्या वेषात आलेल्या १० दहशतवाद्यांनी कामरा हवाई तळावर हल्ला केला. हा तळ लष्करीदृष्ट्या महत्वाचा आहे. राजधानी इस्लामाबाद आणि पेशावर या देशातील महत्वाच्या बंदरादरम्यान हा तळ आहे.
हवाई तळावर हल्ला झाल्याचे लक्षात येताच विशेष कमांडो पथकाने कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांवर गोळीबारासह रॉकेट्सचा मारा करण्यात आला. ही चकमक पहाटे ६ वाजेपर्यंत सुरू होती. या चकमकीत ६ दहशतवादी ठार तर ६ जवान जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ५ अतिरेक्यांचे मृतदेह घेऊन उरलेले अतिरेकी पळून गेले.
याच तळावर यापूर्वी दहशतवाद्यांनी १० डिसेंबर २००७ रोजी स्फोटकांनी भरलेली कार धडकविली होती.