सिंगापूर भविष्यातील सर्वाधिक श्रीमंत अर्थव्यवस्था

भविष्यात म्हणजे २०५० पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था म्हणून सिंगापूर, हाँगकाँग, तैवान आणि द.कोरिया हे देश उदयास येतील असे प्रॉपर्टी क्षेत्रातील बलाढ्य संस्था नाईट अॅन्ड फ्रँक आणि सिटी प्रायव्हेट बँक यांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या संस्थांच्या मते या भागांचा ज्या वेगाने विकास होत आहे त्यामुळे तेथील अर्थनिर्मितीलाही चालना मिळाली आहे. हे देश आशियातील अब्जाधीशांची संख्या वेगाने गाठतीलच पण त्यात ते उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपलाही कांही काळात मागे टाकतील.

सिंगापूरने २०१० सालात पहिल्या दहा अर्थव्यवस्थात पहिला क्रमांक मिळविला असून आजही तो कायम आहे. २०५० सालातही सिगापूरच प्रथम क्रमांकावर असेल असे या सर्वेक्षणातून आढळले आहे. तेथील जीडीपी पर कॅपिटा त्यावेळी १३७,७१० डॉलर्सवर पोहोचलेला असेल. हाँगकाँग दुसर्‍या स्थानावर असेल तर त्यापाठोपाठ असतील तैवान आणि द.कोरिया. या यादीत २०५० सालात २०१० साली तिसर्‍या क्रमांकावर असलेले यू.एस पाचव्या स्थानावर फेकले गेलेले असेल. तैनाव आणि द.कोरिया २०१० सालात पहिल्या दहात नसूनही २०५० सालापर्यंत त्यांनी या क्रमांकात चांगलीच आघाडी घेतलेली असेल असेही या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. 

२०१६ सालापर्यंत दक्षिण पूर्व आशिया, चीन आणि जपान येथील अब्जाधीशांची संख्याही लक्षणीयरित्या वाढेल असेही यात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment