नागपूर: मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील दंग्याबाबत विविध दंगलींचे चित्रण सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रक्षेपित करून जमावाला भडकाविण्यात आल्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितले.

नागपूर: मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील दंग्याबाबत विविध दंगलींचे चित्रण सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रक्षेपित करून जमावाला भडकाविण्यात आल्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितले.
आसाममधील दंगलीविरोधात मुंबईतील मोर्चापूर्वी म्यानमार आणि आसाममधील दंगलींचे चित्रण काही समाजकंटकांनी यु ट्यूब आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवरून प्रक्षेपित केले. म्यानमारचे म्हणून दाखविण्यात आलेले हे चित्रण गुजरात दंगलीचेही असू शकते; अशी शक्यता पाटील यांनी वर्तविली.
हे चित्रण प्रक्षेपित करणार्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल; असेही पाटील म्हणाले.