काँग्रेसच्या युवराजांचा काळा पैसा विदेशातः अ‍ॅड. जेठमलानी

नवी दिल्ली: विदेशात काळा पैसा गुंतविणार्यांची जी यादी सरकारला मिळाली आहे; त्यात कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचे ही नाव असल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी केला आहे

अ‍ॅड. जेठमलानी यांनी रामदेव बाबा यांचे उपोषण समाप्त होताना उपोषणस्थळाला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

विदेशात काळ्या पैशाची गुंतवणूक करणार्‍या व्यक्तींच्या यादीत काँग्रेसचे युवराज राहुल यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्याच्या नावाचा समावेश आहे. त्याचमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त विकास आघाडीचे सरकार त्यांची नावे दडविण्यासाठी ही यादी प्रसिद्ध करण्यास तयार नाही; असा आरोपही त्यांनी केला.