पुणे,दि.१२ – आयशर मोटार कंपनीने पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील बाजारपेठेसाठी पाच ते ४० टन वजनाचे ट्रक आणि १५ ते ६५ आसन क्षमता असलेल्या बस सादर केल्या.
आयशरची नवी वाहने बाजारात
देशातील मालवाहतूक करणार्या वाहनांच्या बाजारपेठेत बसमध्ये ३५ टक्के हिस्सा आयशरचा आहे, अशी माहिती उपाध्यक्ष जी. शेखर यांनी दिली.
व्हॉल्वोचे तंत्रज्ञान आणि आयशरचे विपणन याचा हा एकत्रित परिणाम आहे असे नमूद करून ते म्हणाले की, स्काय लाईन बसना पुण्याच्या बाजारपेठेत मोठी मागणी असून, येथील शिक्षण आणि वाहन उद्योगाचा वाढता परीघ हे त्याचे कारण आहे.
पुण्यात त्यासाठी तलवार ऑटो हे प्रमुख वितरक असून त्यांच्याकडून ताथवडे, आकुर्डी आणि चाकण अशा तीन ठिकाणी नवी विक्री केंद्रे सुरु केली जाणार आहेत. विक्री नंतरच्या सेवेसाठी आकुर्डी मध्ये आधुनिक वर्कशोप सुरु केला जाणार आहे.
