रामदेव बाबांच्या ३ दिवसीय उपोषणात ४००० आंदोलक आजारी

नवी दिल्ली,दि.१२ – योग गुरू बाबा रामदेव यांच्या उपोषणादरम्यान आतापर्यंत सुमारे ४००० आंदोलक आजारी पडले आहेत. ६ आंदोलकांची प्रकृती इतकी खराब झाली की, त्यांना एलएनजेपी रूग्णालयात पाठवावे लागले.

बाबा यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी देशभरातून सुमारे २० हजार लोक रामलीला मैदानात जमा झाले होते. काही लोकांनी तर उपोषणासाठी फार्म देखील भरले. सुत्रानुसार दीड हजार लोक बाबासोबत उपोषणावर बसले. रामलीला मैदानात चिकित्सकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे चार हजार आंदोलकांची प्रकृती खराब झाली आहे.

बहुतांश लोकांना उष्णतेमुळे चक्कर येण्याची तक्रार तर काहींना डोकेदुखी, डिहायड्रेशन, डायरिया आणि उलट्याची तक्रार मिळाली. लोकांची प्रकृती खराब झाल्याची माहिती बाबांना मिळाल्यावर त्यांनी म्हटले की, उपोषणावर बसलेल्या लोकांनी चांगले पाणी प्यावे. उष्षणता खुप आहे यामुळे लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी ठेवावी. 

Leave a Comment