भारताचा राणा पायी चालण्याच्या स्पर्धेत ३६ व्या स्थानी

लंडन, दि.११ – भारताचा बसंत बहादुर राणा लंडन ऑलिम्पिकमधील ५० किलोमीटर पायी चालण्याच्या स्पर्धेत ३६ व्या स्थानी राहिला. राणाने ३ तास ५६ मिनिट ४८ सेकंद वेळेचा नवा राष्ट्रीय विक्रम केला.  

रशियाच्या सर्गेई कि र्डियापकिनने ऑलिम्पिक विक्रमासह पहिले स्थान मिळविले. सर्गेईने ही शर्यत ३ तास ३५ मिनिटे ५९ सेकंदात पूर्ण केली. त्याने ३ तास ३७ मिनिटे ०९ सेकंदाचा गेल्या ऑलिम्पिकमधील विक्रम मोडला.

ऑस्ट्रेलियाच्या जारेड टैलेंटने ३ तास ३६ मिनिटे ३५ सेकंदासह रौप्य पदक जिंकले. चीनच्या तयांगफेंगने ३ तास ३७ मिनिटे १६ सेकंदाचा वेळ घेऊन कांस्य जिंकले. 

Leave a Comment