पेइचिंग, दि. ११ – चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीचा काही भाग पावसामुळे ढासळला आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून चीनची भिंत ओळखली जाते. उत्तर चीनमधील हेबई भागात भिंतीचा काही भाग ढासळल्याचे आढळून आले.

पेइचिंग, दि. ११ – चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीचा काही भाग पावसामुळे ढासळला आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून चीनची भिंत ओळखली जाते. उत्तर चीनमधील हेबई भागात भिंतीचा काही भाग ढासळल्याचे आढळून आले.
प्राप्त माहितीनुसार, चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा फटका भिंतीला बसला आहे. दाजिंगमेन डोंगरावरुन पाण्याचा मोठा प्रवाह भिंतीवर धडकला.पावसामुळे भिंतीला तडेही गेले. सुमारे ३६ मीटरपर्यंतची भाग ढासळला आहे.
या भिंतीचे काम मिंग राजवटीच्या काळात (१३६८ ते १६४४) करण्यात आले होते. शेकडो वर्षानंतर भिंतीची झिजही झाली. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.