पाकमधील हिंदूंना भारतात जाण्याची मनाई

लाहोर,दि.११ – सिंध प्रांतातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाचे नागरिक भारतात स्थलांतरित होत असल्याच्या वृत्तामुळे १३० हिंदू कुटुंबांना पाकिस्तानी स्थलांतरण प्रशासनाने शुक्रवारी भारतात जाण्याची परवानगी नाकारली. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिक्युरिटी क्लिअरन्स नसल्याने पारपत्र असूनही भारतात जाता येणार नाही, असे पाकिस्तानी स्थलांतरण प्रशासनाने १३० हिंदू कुटुंबांना सांगितले आहे.

हिंदूंना धार्मिक स्थळांना भेट देण्यासही भारतात जाऊ देऊ नका, असा आदेश अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने स्थलांतरण प्रशासनाला दिला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता बरेच हिंदू कुटुंब वाघा सीमा चौकीवर आले होते. त्यातील कराची येथील केवळ दोन कुटुंबांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात आली.