पृथ्वीप्रमाणे मंगळाचा क्रेटर – जॉन ग्रोटजिंगर

पासाडेना(यूएस), दि. १० –  लाल गृह मंगळाचा प्राचीन क्रेटर कॅलिफोर्नियाच्या मोजावे मरूस्थळासारखा दिसतो. वैज्ञानिकांनी सांगितले की, येथेही मोजावे मरूस्थळाप्रमाणे पर्वत असून धुके पसरलेले आहे. हे तेच ठिकाण आहे जेथे मंगळावर जीवन असण्याची शक्यता शोधण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे क्यूरियोसिटी रोवर उतरले आहे. 

कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे मुख्य वैज्ञानिक जॉन ग्रोटजिंगरनुसार पहिल्या नजरेत पाहिल्यावर मंगळाचा हा भाग हूबहूब पृथ्वीसारखा दिसतो. अणुऊर्जेने संचलित रोवरने मंगळचे गेल क्रेटरच्या आजुबाजुचे अनेक ब्लॅक ऍण्ड व्हाईट आपल्या पाठवलेल्या नवीनतम छायाचित्रात क्यूरियोसिटीने उत्तर क्षितिजकडून वळताना छायाचित्र ओढले. तेथे मंगळच्या पटलावर गडद खुन होती व धुळ उडत होती.

मानले जात आहे की, क्यूरियोसिटी देखील धुळीने प्रभावित असेल परंतु वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, असे झाले नाही. नासाचे जेट प्रोपल्शन लॅबोरेट्रीमध्ये इमेजिंग वैज्ञानिक मेकी जस्टिन यांनी सांगितले की, आम्ही धुळीची एक पातळ परत पाहिली असून घाबरण्याची गरज नाही. 

ग्रोटजिंगर म्हणाले की, मंगळने प्राप्त भू-दृश्य वेगवेगळे आहे. याला पाहून असे वाटते की, तुम्ही पृथ्वीवर आहात. तसेच मंगळ पृथ्वीने खुप वेगळा आहे. हे विकिरणाने प्रभावित थंड मरुस्थळ आहे. भू-वैज्ञानिक संकेतानुसार, काही काळापूर्वीपर्यंत हे जास्त उष्ण व नम होते.

या मिशनचे एक उद्देश्य मंगळ रूपांतरित होण्याची प्रक्रिया शोधण्याचे देखील आहे.