भारताने ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी केल्याने भविष्य उज्ज्वल : गोपीचंद

हैदराबाद, दि. १० – भारताने यंदा लंडन ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी केली असून, बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालने ब्रॉंझ पदक मिळविल्याने आपल्याला यापुढे उज्वल भविष्य आहे, असे बॅडमिंटनचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी म्हटले आहे. 

गोपीचंद हे साईनाचे गेल्या नऊ वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.

गोपीचंद यांचे लंडनहून भारतात परतले तेव्हा, पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘आपले खेळाडू तरुण आहेत, त्यामुळे खरंच आपल्याला उज्वल भविष्य आहे. मला विश्वास आहे की, ऑलिंपिकमध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करून दाखवतील. साईना व पी. कश्यप यांनी चांगली कामगिरी करून दाखविली आहे. दोघेही जागतिक दर्जाचे खेळाडू असून, ते महत्त्वाचे खेळाडू आहेत.’  

Leave a Comment