सनीला करायचय आमीरसोबत काम

शहराशहारातून ज्या सिनेमाची पोस्टर चर्चेची बनली आहेत त्या ‘जिस्म-२’ मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या व पोर्न अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनी लीयोनला मि. परफेक्शनिस्ट आमीर खान सोबत काम करायचे आहे. काही दिवसापूर्वीच तिने सल्लूमियाँ सोबत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.

सनी म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये इतर हिरोच्या तुलनेत सर्वात जास्त मला अमीर खान आवडतो. आगामी काळात अमीर सारख्या सुपरस्टार सोबत एखाद्या तरी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. सध्या मी दिवसातून दोन ते तीन तास हिंदी बोलण्याची प्रॅक्टिस करीत आहे. बिझी शेडूल सांभाळत त्यासाठी खूप मेहनत घेत असून काही दिवसातच मला हिंदीमध्ये बोलता येईल असा विश्वास वाटतो .’

३ ऑगस्ट रोजी रिलीज झालेला ‘जिस्म-२’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. सुरुवातीच्या चार दिवसातच चित्रपटाने २१ कोटीची कमाई केली आहे. त्यामुळे सनी सध्या एन्जॉय करीत आहे. सध्या तिच्याकडे अनेक हिंदी सिनेमाच्या ऑफर आल्या आहेत असेही समजते. मात्र ‘जिस्म-२’ जर सनीच्या बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल रोलमुळे हिट ठरला तर तिच्याकडे नवीन प्रोजेक्ट घेऊन बॉलीवूडमधील निर्मात्याची रांग लागणार यात शंका नाही.