शर्यतीपूर्वीच अँड्रयू मॅक्केबेचे बूट गेले चोरीला

लंडन, दि. ८ – ऑस्ट्रेलियाचा ऍथलीट अँड्रयू मॅक्केबेचा श्वास धावण्यापूर्वीच रोखला गेला, जेव्हा त्याला त्याची ट्रेनिंग बॅग चोरीला गेल्याचे समजले. या बॅगमध्ये त्याचे धावण्याचे बूट होते. आणि विशेष म्हणजे येत्या शुक्रवारी त्याची स्पर्धा आहे. बॅग चोरीला गेल्यामुळे अँड्रयू नाराज असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले.

ते म्हणाले,’ जुन्या बुटाची सवय असताना नवीन बूट घालून पळणे हे धोक्याचे असते. आणि विशेष करून ऑलिम्पिक सारख्या खेळांमध्ये हे महागात पडू शकते.’ सध्या पोलिसांनी बॅगचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे.

या प्रकरणात दोन संशयीत आढळून आले असून त्यातील एकास चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आहे. त्यामुळे आशा करूयात की अँड्रयू येत्या शुक्रवारी त्याचे जुने बूट घालूनच पळताना दिसेल.