मुख्यमंत्री पर्रीकरांचे गुटख्याचे व्यसन सुटते तेव्हा…

दि. ८ –  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले की, इयत्ता सहावीत शिकणार्या एका विद्यार्थ्याला थेट तोंडाला पुडी लावून गुटखा खातानाचे दृश्य पाहिले, आणि आपणही गुटखा खाण्याची सवय सोडली पाहिजे, अशी उपरती झाली. त्यातून राज्यात गुटखा बंदीचा विचार मनात आला. अशी कबुली दस्तुरखुद्द पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत शून्य प्रहराच्या तासाला दिली.

गुटख्याचे उत्पादन, विक्री आणि साठ्यावर बंदी आणण्यासाठी सरकार कायदेशीर पर्याय शोधत असल्याचेही पर्रीकर यांनी या वेळी सांगितले. त्यांनी सभागृहाला सांगितले की, मीदेखील गुटखा खात होतो. मात्र, आता गुटख्यावर बंदी आणण्याचा निर्णयही मीच घेतला आहे. मलादेखील गुटख्याचे व्यसन होते. त्यामुळेच त्यावर बंदी आणणे मला आवश्यक वाटले.