टीम अण्णांच्या राजकारणप्रवेशाला हॅकर्सचा पाठींबा

नवी दिल्ली: टीम अण्णाच्या राजकारणप्रवेशाला हॅकर्सच्या एका मोठ्या समूहाने पाठींबा दिला आहे.

आपले समर्थन व्यक्त करण्यासाठी राजकीय पक्ष आणि भ्रष्ट नेत्यांच्या वेबसाईट्सबरोबरच महत्वाच्या शासकीय वेबसाईट्स अल्पकाळ हॅक करण्याचा इशाराही या समूहाने दिला आहे.

यापूर्वी सरकारच्या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणाचा निषेध करण्यासाठी या हॅकर्सच्या समूहाने सर्वोच्च न्यायालयासह अनेक न्यायालयांच्या वेबसाईट्स काही काळ हॅक केल्या होत्या.