दुष्काळाला तोंड देण्यासाठी केंद्र राज्याला सर्वतोपरी मदत देणार : पवार

मुंबई: परतीच्या पावसाचे चित्र फारसे आशादायक नसल्याने राज्यातील दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले असून या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र शासन राज्याला सर्वतोपरी मदत करेल; अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या वतीने दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात पाणी आणि चाऱ्याची परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून हे दुष्काळाचे सावट सन १९७२च्या दुष्काळापेक्षाही अधिक गंभीर आहे; असे सांगून पवार यांनी केंद्राकडून राज्याला अधिकाधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. विशेषत: नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात अतिशय बिकट परीस्थेती असून शासकीय यंत्रणांबरोबर राजकीय कार्यकर्त्यांनी मदतकार्यासाठी पुढे यावे; असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्याच्या साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात पवार यांनी राज्यातील गुप्तचर यंत्रणा अधिक बळकट करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.

Leave a Comment