लंडन: ऑलिम्पिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रतिस्पर्ध्यावर वेल्टर वेट गटातील भारतीय मुष्टीयोद्धा विकास कृष्ण यादव याने निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्याला विजयी घोषितही करण्यात आले. मात्र त्यानंतर त्याचे ९ फाऊल झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याचे विजेतेपद रद्द करण्यात आले.
‘फाऊल’ विकासचा आणि पंचांचाही
उपउपांत्य फेरीत विकास आणि अमेरिकेचा इराल स्पेन्स यांची लढत झाली. या लढतीत विकासचा वरचष्मा होता. त्याने आक्रमक फटके लगावून इराल याला जेरीस आणले. १३-११ अशी आघाडी घेणारया विकासला पंचांनी विजयी घोषितही केले. मात्र इरालने या निकालाबाबत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडे अपील केले. अपिलावर निर्णय घेण्यासाठी या सामन्याचे चित्रीकरण तपासले गेले. त्यात विकासाने नऊ फाऊल केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विकासचे गुण कमी होऊन इरालचे गुण वाढले. अर्थातच इरालला ११-१५ अशा गुणाधिक्याने विजयी घोषित करण्यात आले.
या प्रकारामुळे लंडन ऑलिम्पिक्समधील पंचाच्या विश्वासार्हतेवर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
