लष्करे तैयबाच्या भारतीय हस्तकांची अबू कडून माहिती

मुंबई दि.४- मुंबईवरील २६/११ च्या दहतशवादी हल्लयाचे नियंत्रण पाकमधील कराचीच्या कंट्रोलरूम मध्ये बसून केलेल्या अबु जिंदालने मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशीत लष्करे तैयबासाठी काम करणार्‍या चार भारतीयांची नांवे सांगितली असून त्यातील दोघे अबुच्या गावचे म्हणजे बीड येथील आहेत. एक जण जम्मूचा आहे तर चौथ्याचे मूळ गांव अद्याप कळू शकलेले नाही. अर्थात अबूची या चौघांशी ओळख पाकिस्तानातच झाली असून तेथे त्याला हे भारतीयच असल्याचे समजले आहे असे अबुचे म्हणणे आहे. बीडच्या दोन संशयितांची चौकशी मुंबई पोलिसांनी यापूर्वीच सुरू केली आहे असे समजते.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार अबूने मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिलेल्या कबुलीत अबु शेरजिल, अबू जरार हे दोघे बीडचे असल्याचे तसेच अबू मुसब हा जम्मूचा असल्याचे सांगितले आहे. चौथा अबु जैद उर्फ लालबाबा याचे गांव मात्र त्याला माहिती नाही असे सांगतानाच अबुने या चौघांचा मुंबई हल्ल्यात सहभाग नसल्याचेही सांगितले आहे. या चौघांशीही अबूची भेट पाकिस्तानाच झाली होती आणि तेथे हे चौघे दीर्घ काळ वास्तव्यास होते असेही अबूने कबुल केले आहे. पाकिस्तानाच या सर्वांचीच राहण्याजेवण्याची व्यवस्था अगदी उत्तम करण्यात आली होती.

अबु मुसब हा औरंगाबाद हत्यारे प्रकरणातील आरोपी आहे तर अबु जैद हा नाशिक पोलिस प्रबोधिनीवर करण्यात येणार्‍या हल्लयाच्या कटातील आरोपी आहे असे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अबू जिंदाल ने त्याच्या जबाबात लष्करे तैयबाची कार्यपद्धती, त्यांचे कमांडर  व त्याचे कामाचे भाग तसेच लष्करसाठी काम करणारे व अँटी इंडिया ऑपरेशनमध्ये सहभागी होणारे अनेक  पाकिस्तानी नागरिक यांचीही माहिती दिली आहे. जुंदाल याला पाकिस्तानातच २००६ सालात प्रशिक्षण दिले गेले आहे. छब्बड हाऊसवरील हल्याच्यावेळी अबु ज्या दोघा दहशतवाद्यांशी फोनवरून बोलला त्या आवाजाचे नमुने कालिना येथे तपासासाठी पाठविण्यात आले असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment