इस्त्रो या महिन्यात तीन उपग्रह प्रक्षेपित करणार

चेन्नई: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो या महिन्यात तीन उपग्रह प्रक्षेपित करणार असून या वर्षाच्या अखेरीस आणखी दोन उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहेत.

या महिन्यात पीएसएलव्ही सी-२१ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने स्पॉट-६ हा फ्रेंच उपग्रह आणि जपानचा लहान आकाराचा एक उपग्रह श्रीहरीकोट्टा या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तिसरा उपग्रह फ्रांसमधील गयाना येथून एरियन रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात येणार आहे; अशी माहिती विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक पी. एस. वीरा राघवन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.