
नवी दिल्ली: टीम अण्णाच्या कोणत्याही उमेदवाराने दिल्लीच्या चांदणी चौक मतदार संघातून निवडणूक लढवावी आणि आपल्याला पराभूत करून दाखवावे; असे आव्हान केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी दिले.
टीम अण्णाने लोकपाल विधेयकासाठी आंदोलनाचा मार्ग सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस जाहीर केला आहे. या निर्णयावर विविध स्तरावरून बऱ्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत.
टीम अण्णाच्या आंदोलनावर; कोणताही कायदा रामलीला मैदानात नव्हे तर संसदेत बनतो; अशी टीका करून सिब्बल पुढे म्हणाले की; मी नेहेमी सत्याची कास धरली आहे. मात्र टीम अण्णाने नेहेमीच मला लक्ष्य केले. चांदणी चौक मतदारसंघातून स्वत: अण्णा हजारे, त्यांच्या टीमचे सदस्य अथवा त्यांच्या कोणत्याही उमेदवाराने स्वत:च्या पक्षामधून किंवा भारतीय जनता पक्षाच्या मदतीने निवडणूक लढवून मला पराभूत करून दाखवावे; असे आव्हान त्यांनी दिले.