लंडन,दि.२ – भारताचा नाविक स्वर्ण सिंह विर्क लंडन ऑलिम्पिक पुरूषांची सिंगल स्कल्स स्पर्धेच्या अंतिम लढतीत पोहचला. स्वर्ण सिंहने एटान डार्नीमध्ये आयोजित तिसर्या उपांत्य लढतीत दुसरे स्थान प्राप्त केले.
स्वर्ण सिंह अंतिम लढतीत दाखल
त्याने ही रेस ७ मिनिट ११.५९ सेकंदात पूर्ण केली. ५०० मीटरनंतर तो दुसर्या स्थानावर होता परंतु २००० मीटरपर्यंत पोहचता-पोहचता चौथ्या स्थानावर घसरला. भारतीय चाहत्यांची या खेळाडूने स्पर्धेत पदक जिंकुन इतिहास रचण्याची अपेक्षा आणखी वाढली.
