भारत हॉकी शर्यतीतून बाहेर

लंडन,दि.२ – भारतीय हॉकी टीम ऑलिम्पिकमध्ये नेदरलँडकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडकडूनही ३-१ ने पराभूत झाली आहे.

ऑलिम्पिकमध्ये आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. भारताने याआधीचे दोन्ही सामने गमावले आहेत. यापूढचा सामना जर्मनीशी होणार आहे. न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यामुळे भारत आता मेडलच्या शर्यतीतून बाहेर गेला.