महाड: पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास महापालिकेला भाग पाडणार्या संभाजी ब्रिगेडने आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा गनिमीकाव्याने हटविला. या प्रकरणी सात जणांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे.
रायगडावरील वाघ्याचा पुतळा गनिमीकाव्याने हटवला
छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा म्हणून वाघ्याचा पुतळा रायगडावर बसविण्यात आला होता. मात्र वाघ्या कुत्रा आणि त्याने महाराजांच्या चितेत उडी मारण्याची गोष्ट; याला इतिहासात पुरावा नाही. हा इतिहासाचा विपर्यास आहे. त्यामुळे वाघ्याचा पुतळा हटवावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने राज्य शासनाकडे केली होती. त्यासाठी अनेक आंदोलनेही झाली. एक वर्षापूर्वी ब्रिगेडने पुतळा हटविण्यासाठी शासनाला मुदतही दिली.
मात्र शासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री हा पुतळा हटवला.
