शिवसेनाप्रमुख ‘मातोश्री’वर रवाना

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बुधवारी संध्याकाळी रुग्णालयातून ‘मातोश्री’ निवासस्थानाकडे रवाना करण्यात आले. त्यांच्यावर इंडोस्कोपी करण्याची आवश्यकता नसल्याचे वैद्यक तज्ज्ञांनी सांगितले आहे.

ठाकरे यांना दि. २४ जुलै रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तपासण्या केल्यावर त्यांच्यावर इंडोस्कोपी करण्याची आवश्यकता भासली. त्यासाठी हैदराबाद येथील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. नागेश्वर राव यांनाही पाचारण करण्यात आले. मात्र मात्र काही दिवस उपचार आणि विश्रांती दिल्यानंतर इडोस्कोपी आवश्यक नसल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला.

ठाकरे यांना घरी पाठविण्यात आले आहे.

Leave a Comment