चीनबद्दल देशभक्तीचे हॉंगकॉंगला वावडे

हॉंगकॉंग: हॉंगकॉंग मध्ये हजारो लोकांनी शाळेत चीनच्या देशभक्तीचे धडे देण्याच्या विरोधात निदर्शने केली. शाळेत देशभक्तीचे धडे शिकवण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.

चीनमध्ये वर्षानुवर्ष कम्युनिस्ट राजवट आहे तर हॉंगकॉंगची जनता लोकशाहीप्रेमी आहे. शालेय अभ्यासक्रमात देशभक्तीच्या नावाखाली लोकशाही विरोधी कम्युनिझमला अनुकूल ब्रेन वॉश केले जाईल अशी भीती लोकांना वाटत आहे.

हॉंगकॉंग लोकशाही समर्थकांचा गड मानला जातो. तिथे कम्युनिस्ट सरकारविरोधात निदर्शने हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना देशभक्ती शिकविण्याच्या विषयाबाबत हॉंगकॉंग चे लोक जास्तच संवेदनशील झालेले आहेत. चीन सरकारने मात्र या विषयाबाबत अजून काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.