ऑलिंपिकमध्ये आज भारताला पदकाची अपेक्षा

ऑलिम्पिकमध्ये सोमवारी भारताला पहिले पदक मिळण्याची शक्यता आहे. अर्धा डझनपेक्षा अधिक खेळ प्रकारात भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. प्रामुख्याने भारतीय संघाला ज्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे ते नेमबाज अभिनव बिंद्रा वा गगन नारंग हे दोघेजण आज नशीब अजमावणार आहेत.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास १०० मीटर एअर रायफलीग प्रकारात अभिनव बिंद्रा व गगन नारंग सहभागी होणार आहेत. त्याने जर ही फेरी क्वालिफाय केली तर अंतिम लढत पाच वाजता होणार आहे. यामध्ये या दोघाकडून ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वेळेसच्या ऑलिंपिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक जिंकले होते.
त्याशिवाय भारताच्या हॉकी संघाचा मुकाबला रात्री ८ वाजता नेदरलँड सोबत होणार आहे. बॉक्सीगमध्ये सुमित संगवानचा मुकाबला होणार आहे. बॅडमीनटनमध्ये रात्री ११ वाजता सायना नेहवलाची लढत बेल्झीमच्या लियोन टनशी होणार आहे. बॅडमीनटन डबलमध्ये ज्वाला गट्टा व अश्विणी पोनाप्पाची लढतही रात्री ११.३० च्या सुमारास होणार आहे. या सर्व लढती पाहता भारतीय संघाला एक तरी पदक आज मिळेल अशी अपेक्षा आहे.