केलिफोर्निया: इंडियाना बास्केटबॉल संघाचा माजी खेळाडू नेल रीड याचे निपोमो येथे हृदयरोगाने गुरुवारी निधन झाले. तो केवळ ३६ वर्षाचा होता. त्याच्या मागे त्याची पत्नी केली आणि मार्ले (६ वर्ष), व प्रेसले (४ वर्ष) अशा दोन मुली आहेत.

रीड सन २००७ पासून सांता मारिया स्कूलमध्ये फुटबॉल, बास्केट बॉल, गोल्फ, व शारीरिक शिक्षण शिकवत होता. कुठल्याही स्पर्धेत जिंकण्यासाठीच त्याचे पूर्ण प्रयत्न असत. नेलने १९९७ साली त्याचे प्रशिक्षक बॉब नाइट यांच्यावर खेळाच्या सरावादरम्यान त्यांनी आपल्याला गुदमरवायचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. ते खरे असल्याचे सरावाच्या वेळी घेतलेल्या चित्रीकरणात सिद्ध झाले. त्यामुळे बॉब नाइटला प्रशिक्षक पदावरून काढून टाकण्यात आले. यानंतर रीडलाही टीममधून काढून टाकण्यात आले.
इंडियानासाठी रीड तीन सिझन खेळला होता. त्याचे ९४ डावात बास्केटची सरासरी ९.८ होती.