राज ३ चित्रपटाचे पोस्टर लाँच

गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या महेश भट्ट यांच्या राज ३ चित्रपटाच्या पोस्टरचे लाँचिंग करण्यात आले. या चित्रपटात किस फेम अभिनेता इम्रान हाश्मी व अभिनेत्री बिपाशा बसू हिची प्रमुख भूमिका आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन करणाऱ्या विक्रम भट्ट यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती थ्रीडी मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकासाठी पर्वणीच ठरणार आहे. भट्ट कॅम्पकडून पहिल्यांदाच थ्रीडी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

मर्डर २, दी डर्टी पिक्चर आणि जन्नत २ ही सुपरहिट चित्रपट यापूर्वी इम्रान हाश्मी यांनी दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडून ही त्याच्या खूप काही अपेक्षा आहेत. त्याशिवाय अभिनेत्री बिपाशा बसू हिच्या अभिनायची या चित्रपटाच्या माध्यमातून कसोटी लागणार आहे. आगामी काळात तिच्याकडे जादा चित्रपट नसल्याने तिच्यासाठी या चित्रपटाच्या यश अपयशावर अवलंबून राहावे लागणार आहे. राज ३ च्या मध्यामातून इम्रान व बिपाशा बसू यांची जोडी पहिल्यांदा पडद्यावर झळकणार आहे. येत्या ७ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment