`फोक्स वॅगन’च्या नफ्यात वाढ

वोल्फ्सबर्ग (जर्मनी),दि.२७ -`फोक्स वॅगन’ कंपनीने मार्चमध्ये बाजारात आणलेल्या टिग्वान व टुअरान या दोन्ही कारच्या प्रचंड खपामुळे त्यांच्या नफ्यात ३६ टक्के वाढ झाली आहे. मध्य जर्मनीतील वोल्फ्सबर्ग येथील उत्पादन विभागात कार तयार होतात.

`फोक्स वॅगन’ ही युरोपातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असून, या समुहाच्या वतीने दहा प्रकारच्या वाहनांची निर्मिती केली जाते. जगभरात टिग्वान आणि टुअरान या दोन्ही कारच्या एकूण ४६ लाख मॉडेल्सची विक्री झाली. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्याच सहामाही सत्रात ३६ टक्के एवढा नफा वाढला आहे.

पहिल्या सहामाहीमध्ये नफ्यात झालेल्या या वाढीमुळे या आर्थिक वर्षात कंपनीच्या एकूण उलाढालीत २३ टक्क्यांनी वरील दोन कारबरोबरच ऑडीच्या एसयूव्ही आणि ऑडी ए-६ या गाड्यांना चीन, अमेरिकन संघराज्य, लॅटिन अमेरिका येथील वाढत्या प्रतिसादामुळे एकूण ९ हजार ५३८ कोटी एवढा नफा झाला आहे.