रणबीर दीपिका थिरकणार जुम्मा चुम्मावर

रणबीर कपूर व दीपिका पदुकोण सध्या ये जवानी है दिवानी या चित्रपटात काम करीत आहेत हे सर्वांना माहिती आहे. ब्रेकअप नंतर प्रथमच हे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लेटेस्ट न्यूज अशी आहे की दोघेही आता या चित्रपटात जुम्मा चुम्मा दे दे या गाण्यावर थिरकणार आहेत.

शेहेनशाह अमिताभ बच्चन आणि किमी काटकर यांच्यावर हे मूळ गाणे १९९१ सालच्या हम चित्रपटात चित्रित करण्यात आले होते. बिग बी अमिताभ बच्चनच्या काही आवडीच्या गाण्यांपैकी हे एक गाणे आहे. रणबीर जुम्मा चुम्मा दे दे या गाण्यावर नुसता डान्सच करणार नाही तर तो या गाण्यासाठी स्वतःचा आवाजही देणार असल्याचे समजते.

ये जवानी है दिवानी हा चित्रपट करण जोहर बॅनरचा असून दिग्दर्शक आयर्न मुखर्जी आहे. विशेष म्हणजे रणबीर आणि दीपिका दोघेही अमिताभ बच्चनचे लहानपणापासून फॅन आहेत. त्यामुळेच दोघानीही अमिताभ बच्चनच्या या गाण्यार डान्स करण्यास आनंदाने होकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही अमिताभच्या अग्निपथ या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करणार होते, मात्र त्यानी हा निर्णय बदलून हम या चित्रपटातील गाणे फायनल केले आहे..

Leave a Comment