
केलिफोर्निया: केलिफोर्नियातल्या बर्लीन्गेम शहरातल्या सीस केंडीज फेक्टरीने ७००३ पौंडाचा सर्वात मोठ्ठा लॉलीपॉंप तयार करून राष्ट्रीय लॉलीपॉंप दिवस साजरा केला. हा जगातला सर्वात मोठा लॉलीपॉंप मानला जातोय. त्याची उंची ६ फुट, रुंदी ३ फुट ६ इंच, तर वजन ७००३ पौंड आहे. चोकलेट फ्लेवर असलेला हा लॉलीपॉंप २० जुलैला सेन फ्रान्सिस्कोमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या लॉलीपॉंपची काडी ११ फुट १० इंच लांबीची आहे. तरीही हि काडी गिनेस बुकमध्ये मोजली गेलेली नाही. लॉलीपॉंप बनवण्याच्या गणितानुसार त्याचे वजन साधारण कारच्या तीन पट तर उंची साधारण अमेरिकन स्त्री च्या उंचीपेक्षा ३ इंच जास्त आहे.
