यामाहाच्या ‘ रे ‘ स्कूटरसाठी दीपिका करारबद्ध

भारतीय स्कूटर बाजारात खास महिलां ग्राहकांसाठी वाहनउद्योग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी यामाहा रे स्कूटर बाजारात आणत असून त्याची जाहिरात, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला करारबद्ध करण्यात आले आहे. एखाद्या वाहनाची ब्रॅड अँबॅसिडर महिला बनण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.

यामाहा स्कूटर ही म्हटले तर नाजूक, म्हटले तर स्पोर्टी आणि टिकण्याच्या दृष्टीने अगदी बेस्ट स्कूटर आहे असे कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक हिरोयुकी सुझुकी यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात, ही स्कूटर खास भारतीय महिलांना समोर ठेवूनच डिझाईन करण्यात आली आहे आणि त्यातही २४ वर्षांपर्यंतच्या युवती आमच्या नजरेसमोर आहेत. दीपिका या प्रॉडक्टची अँबॅसिडर आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. या कामासाठी दीपिकाच योग्य होती कारण आमची स्कूटर दीपिकासारखीच स्टायलीश, दीपिकासारखीच स्पोर्टी, फिट आणि आकर्षक आहे. दीपिका सूर्यकिरणासारखी तेजस्वी आहे आणि आमच्या स्कूटरने नांवही रे असेच आहे. रे म्हणजे किरण.

या स्कूटरच्या जाहिरातींचे काम सुरू झाले असून यामाहाच्या फ्लॅगशीप बाईकसाठी अँबॅसिडर म्हणून जॉन अब्राहमलाच कायम ठेवण्याचा निर्णयही कंपनीने घेतला आहे असे सांगण्यात आले.