मुंबई दि.२४- कटक येथे आक्टोबरच्या तीन तारखेला होणार्या ऑल इंडिया लेव्हल पोलिस शूटिंग स्पर्धांसाठी मुंबई पोलिसांतील तीन जणांची निवड झाली आहे. पोलिस निरीक्षक अनिल सरदाळ, हवालदार उद्धव जाधव आणि समिता पाटील अशी त्यांची नावे आहेत. पुण्याजवळील दौंड येथे १० ते १५ जुलै या कालावधीत पार पडलेल्या महाराष्ट्र पोलिस शूटिंग स्पर्धात या तिघांनी पदके मिळविल्याने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
ऑल इंडिया शूटिंग स्पर्धांसाठी मुंबईतील तीन पोलिसांची निवड
पोलिस निरीक्षक अनिल सरदाळ हे या स्पर्धेत महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व करणारे मुंबईचे एकमेव अधिकारी आहेत. त्यांनी दौंड येथील स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविले आहे तर हवालदार जाधव आणि पाटील यांनी रौप्यपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत ६२ स्पर्धक सहभागी झाले होते.
कटक येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ३० टीम येणार आहेत. या स्पर्धा ऑल इंडिया पोलिस स्पोर्टस कंट्रोल बोर्डाकडून आयोजित केल्या जातात. कांही नामवंत संघांमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, महारराष्ट्र पोलिस, पंजाब पोलिस व उत्तराखंड पोलिस या संघांचा समावेश आहे.
