लवकरच येणार जिस्म ३

जिस्म २ हा चित्रपट अजून रिलीज झालेला नसताना दिग्दर्शक असलेल्या पूजा भट्टने मात्र जिस्म ३ ची तयारी सध्या सुरु केली आहे. हा चित्रपट ३ डी बनविण्याच्या विचारात पूजा भट्ट आहे. त्यामुळे येत्या काळात आणखीन एक इंटरेस्टिंग चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना या निम्मिताने मिळणार आहे.

एका मुलाखातप्रसंगी पूजा भट्ट म्हणाली की, जिस्म ३ या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप पूर्वीच लिहून पूर्ण झाली आहे. आता लवकरच या चित्रपटाचे काम ही सुरु करण्याचा विचार मी करीत आहे. हा चित्रपट ३ डी एफेक्ट मध्ये तयार करण्याच्या विचारात मी आहे. सुरुवातीच्या काळात जिस्म २ हा चित्रपट ३ डी एफेक्ट मध्ये तयार करण्याचा विचार मी करीत होते मात्र ती वेळेपेक्षा खूप अॅडवान्स होईल म्हणून टाळले.

चित्रपटची घोषणा केल्यानंतर या चित्रपटात कोण भूमिका करणार या प्रश्नाला उत्तर देताना पूजाने स्पष्ट केले की, सध्या मी अजूनतरी अभिनेत्रिची निवड मी केलेली नाही. मात्र पहिल्या भागात असलेली बिपाशा दुसऱ्या भागात नसल्याने सन्नी लियोनही तिसऱ्या भागात नसणार आहे. त्यामुळे आता जिस्म ३ मध्ये नवीन चेहरा पहावयास मिळणार आहे. जिस्म २ च्या निमिताने आम्ही काही बोल्ड स्टेप्स उचलल्या होत्या. त्यामुळे आता भाग तीन मध्ये ही याच्या पुढच्या स्टेप्स असतील. हा चित्रपट पुढील वर्षी फ्लोरवर जाणार असल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.