न्यूयॉर्क, दि. २२ – पावसाच्या बदलत्या वेळापत्रकाचा आणि अनियमततेचा फटका केवळ भारतालाच नाही, तर अमेरिकेलाही बसला आहे. त्यामुळे सध्या अमेरिका भीषण दुष्काळाचा सामना करत आहे.

न्यूयॉर्क, दि. २२ – पावसाच्या बदलत्या वेळापत्रकाचा आणि अनियमततेचा फटका केवळ भारतालाच नाही, तर अमेरिकेलाही बसला आहे. त्यामुळे सध्या अमेरिका भीषण दुष्काळाचा सामना करत आहे.
हा १९५६ नंतरचा सर्वात मोठा दुष्काळ असल्याचे अमेरिकेच्या हवामान विभागाने म्हटले आहे. अमेरिकेतील तब्बल ५५ टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. या दुष्काळाचा सर्वात मोठा फटका मका आणि सोयाबीनला बसला आहे.
सध्याच्या स्थितीत मक्याला पाण्याची गरज आहे. नेमक्या याचवेळी पिकाला पाणी न मिळाल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. मक्याचे सर्वांत जास्त उत्पादन घेणार्या १८ राज्यांत ५० टक्के तर काही भागात संपूर्ण पीक पाण्याअभावी जागेवरच जळाले आहे.
जनावर्यांच्या चार्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. २६ राज्यांतील १००० काउंटी अर्थात परगण्यांमध्ये आपत्काळ जाहीर केला आहे. अमेरिकेतून मका, सोयाबीन आणि गव्हाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. त्यामुळे जागतिक पातळीवर अन्नधान्याचा आणि महागाईचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.