`झी मराठी’ वाहिनी लवकरच ’हप्ता बंद’ या आगळ्या वेगळ्या रिऍलिटी शोचे दुसरे पर्व आपल्या भेटीला घेऊन येत आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना कर्जमुक्त करणे, ही ’हप्ता बंद’ या कार्यक्रमाची संकल्पना आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला मिळालेले यश पाहून आता वाहिनीने या कार्यक्रमाचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आणायचे ठरवले आहे.
मकरंद अनासपुरे करणार तुमचा ’हप्ता बंद’
दुसर्या पर्वात अभिनेता मकरंद अनासपुरे स्पर्धकांचा ’हप्ता बंद’ करुन त्यांची कर्जातून सुटका करणार आहे. अर्थात, या दुसर्या पर्वाची जबाबदारी मकरंद अनासपुरे सांभाळणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे सुत्रसंचालन आदेश बांदेकर यांनी केले होते. मात्र, आता मकरंद अनासपुरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर येतोय. या कार्यक्रमासाठी मकरंदच्या मानधनाचा आकडा दीड लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. मराठी वाहिनीवरील रिएलिटी शोमध्ये मकरंद सर्वाधिक मानधन घेणारा अँकर ठरणार आहे. मकरंद अनासपुरे नंतर पल्लवी जोशी (गौरव महाराष्ट्राचा), सिद्धार्थ जाधव (आता होऊन जाऊ द्या), अमृता खानविलकर (कॉमेडी एक्स्प्रेस) यांचा नंबर लागतो.
