`भारताने एफडीआय मर्यादा वाढवावी’

वॉशिंग्टन, दि. १९ – अमेरिकेच्या एका थिंक टँकने भारताला थेट विदेशी गुंतवणूकी (एफडीआय) ची मर्यादा २६ ऐवजी ५० टक्क्यांपेक्षा जास्त करायला हवी, असा सल्ला दिला. जेणेकरून अमेरिकी कंपन्या संरक्षण उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित होतील.

`सेंटर फॉर स्ट्रैटेजिक एंड इंटरनेशन स्टडीज’ ने आपल्या अहवालात अमेरिका आणि भारत दोन्ही देशांना संरक्षण भागीदारीची पूर्ण शक्यता निर्माण होण्यासाठी अनेक सूचना केल्या. त्यापैकी एक म्हणजे एफडीआयची मर्यादा वाढविणे आहे. अहवालत म्हटले की, अमेरिका-भारत संरक्षण व्यापारात गेल्या दशकात खूप बदल झाला आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात आज अमेरिकी कंपन्या अधिक सक्रिय आहेत. सूचना अमलात आणल्यास दोन्ही देशांचे संरक्षण संबंध आणखी दृढ होतील.