वॉशिंग्टन मतदार नोंदणी फेसबुकवर

वॉशिंग्टन, दि. १९ – वॉशिंग्टन राज्य अमेरिकेचा असा पहिला राज्य बनला आहे, जेथे मतदारांचे पंजीकरण फेसबुकद्वारे शक्य होईल. फेसबुकवर वॉशिंग्टन राज्याच्या पेजवर गेल्यानंतर लोकांना आपले नाव व जन्मदिनांक कळेल. यानंतर मत टाकण्यासाठी इच्छुक मतदार यात आपले ओळखपत्र किंवा वाहन चालक लायसन्सविषयी अतिरिक्त माहिती भरू शकतील. राज्य सरकारच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, लोकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी आकर्षित करण्याची ही सर्वात चांगली पद्धत आहे. अधिकार्‍यांनुसार ही खुप सोपी पद्धत असून ही पुढील आठवड्यापर्यंत उपलब्ध होईल. फेसबुक मतदारांचे नाव व त्यांच्या जन्मदिनांकाच्या व्यतिरिक्त स्वत:कडे आणखी कोणतीही माहिती ठेवणार नाही.

वॉशिंग्टन राज्याने हे पाऊल तेव्हा उचलले जेव्हा सर्व राज्यांनी लोकांचे पंजीकरण किंवा मतदान करण्यासाठी आणखी दस्तावेजची मागणी करण्याबाबत नियम एकतर पारित केला आहे किंवा मग अजुन प्रक्रियेत आहे.
पत्रकारांचे म्हणणे आहे की, हे पाऊल सहा नोव्हेंबरला होणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीला पाहून उचलण्यात आले आहे.

सोपी पद्धत
वॉशिंग्टनने २००८ मध्येच मतदारांचे ऑनलाइन पंजीकरण सुरू केले होते. एकंदरीत एक डजनपेक्षा जास्त राज्य आता ऑनलाइन पंजीकरणची सुविधा पुरवठा करत आहे.

परंतु वॉशिंग्टनची राजधानी ऑलम्पियामधील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, राज्यातील लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी अजून आणखी काम करण्याची गरज आहे.

निवडणुकीचे सह-संयोजक शेन हॅल्मिन म्हणाले, ’सोशल मीडियाच्या या युगात जास्तीत जास्त लोक ऑनलाइन सुविधेकडे जात असून, ही पद्धत लोकांचे ऑनलाइन पंजीकरण करण्यासाठी खूप सोपी आहे. फेसबुकवर उपस्थित असलेल्या मित्रांच्या शक्तीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकांचे पंजीकरण केले जाऊ शकते.’

Leave a Comment