आता डासांमुळे मलेरिया पसरणार नाही

दिल्ली, दि. १९ – अमेरिकन वैज्ञानिक प्रयोगशाळेत जीनमध्ये बदल करून एक असे बॅक्ट्रिया बनवण्यात यशस्वी झाले. जे मलेरिया पसरवणारे प्लासमोडियम वाइवेक्सला मारते. याप्रकारे डास मलेरिया पसरऊ शकणार नाही.

जॉन हापकिंस मलेरिया संशोधन संस्थेच्या संशोधकांनी सांगितले की, त्यांच्या यशाने मलेरियावर ताबा मिळवणे सोपे होईल. मलेरियाने दरवर्षी जगभरात सुमारे आठ लाख लोकांचा मृत्यू होतो, ज्यात बहुतांश मुले असतात. जगात मलेरियाचा प्रकोप पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. परंतु याला समाप्त करण्यात यश मिळाले नाही.

`प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ साइंसेज’ नावाच्या साप्ताहिकेत प्रकाशित झालेल्या अध्ययनात संशोधकांनी पेंटोएआ एग्लोमेरान्स नावाच्या जीवाणुला जीनमध्ये परिवर्तीत केले. जेणेकरून मलेरिया संक्रमण असणार्‍या प्लासमोडियम वाइवेक्सला रोखले जाऊ शकेल. परंतु ते डास किंवा लोकांसाठी नुकसानकारक राहणार नाही. मलेरियाची मोजणी आजही जगातील धोकादायक आजारांमध्ये होते. दरवर्षी दहा लाखाच्या जवळपास लोक याला बळी पडतात.

यात बहुतांश लोक आफ्रिकेचे असतात वैज्ञानिकांचे मत आहे की, मलेरियाविरूद्ध लढाई एक सतत प्रयत्न आहे. कारण कोणतेही औषध दिर्घ कालावधीपर्यंत सहाय्यक होत नाहीत. जोपर्यंत प्लासमोडियम वाइवेक्सला समाप्त केले जाणार नाही तोपर्यंत मलेरियाविरूद्ध लढाईत विजयी होणे शक्य नाही. अशियामध्ये तर मलेरियाचे काही परजिवीवर आर्टिमिसनिनचा परिणाम देखील होत नाही. औषधाने मलेरियाविरूद्ध लढाईत विजयी होणे शक्य नाही, असे स्पष्ट आहे.