‘अशिष्ट’ मॉडेल गेहेना वसिष्ठकडून राष्ट्रध्वजाचा अवमान

पुणे, दि. १८ –  राष्ट्रध्वज बिकीनीसारखा गुंडाळून त्याचा अवमान करणाऱ्या गेहेना वसिष्ठ या ‘अशिष्ट’ मॉडेलवर पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

गेहेनाने फोटोशूट करताना भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा कमरेभोवती गुंडाळून अश्लील ‘पोजेस’ दिल्या. या प्रकाराबद्दल काही नागरिकांनी तिला मारहाणही केली. मात्र, या नंतरही ही छायाचित्र एका वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. ही बाब पुण्यातील एक जागरूक नागरिक रवींद्र ब्रम्हे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गेहेनाच्या विरोधात तक्रार दिली.

त्यानुसार तिच्यावर राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांनी दिली.