तब्बल पाच वर्षांनी भारत पाक क्रिकेट मालिकेची शक्यता

नवी दिल्ली, दि. १६ –  केंद्र शासनानाकडून परवानगी मिळेल या अपेक्षेने भारतीय क्रिकेट बोर्डाने तब्बल पाच वर्षांनंतर भारत पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे नियोजन केले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार डिसेंबर महिन्यात पाक संघ भारताचा दौरा करणार असून, या दौर्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामने होणार आहेत.

सन २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले गेले आणि दहशतवाद्यांना सीमेपलीकडून मिळणारी मदत थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळणे थांबविण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या तूर एंड फिक्चर्स समितीची बैठक आज येथे पार पडली. या बैठकीत २२ डिसेंबर ते ११ जानेवारी दरम्यान भारत-पाक एक दिवसीय क्रिकेट मालिका खेळविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. या कालावधी बाबत भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची सहमती झाली आहे. आता दोन्ही संघटना भारत सरकार कडून या दौर्याला हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
     

Leave a Comment