
नवी दिल्ली, दि.१८ – भारतीय तेल कंपन्या तेलाच्या शोध घेत असलेल्या व्हिएतनामच्या समुद्रावर हक्क सांगून त्या ब्लॉकचा लिलाव करण्याची दादागिरी चीनने सुरू केली आहे.

नवी दिल्ली, दि.१८ – भारतीय तेल कंपन्या तेलाच्या शोध घेत असलेल्या व्हिएतनामच्या समुद्रावर हक्क सांगून त्या ब्लॉकचा लिलाव करण्याची दादागिरी चीनने सुरू केली आहे.
व्हिएतनामच्या अखत्यारीत असलेल्या दक्षिण चीन समुद्रातील ब्लॉक क्रमांक १२८ या ठिकाणी भारताची ओएनजीसी विदेश ही कंपनी तेल शोधण्याचे काम करीत आहे. मात्र चीनने कुरापत काढून या ब्लॉक सह ब्लोक क्रमांक ९ च्या क्षेत्रात तेल शोधण्याच्या हक्काचा लिलाव करण्याचा घाट चायना ऑफशोअर ऑईल कोर्पोरेशनने घातला आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदाही मागविल्या आहेत.
वास्तविक, या सागरी क्षेत्रावर व्हिएतनामचा हक्क असून, ओएनजीसीने यापूर्वी व्हिएतनामबरोबर करार करून संशोधनही केले. तेलसाठे न सापडल्याने आणि कराराची मुदत संपुष्टात आल्याने ओएनजीसीने काम थांबविले. दरम्यान, या क्षेत्रात भारतीय कंपनीनेच काम करावे, अशी व्हिएतनामची इच्छा असून, पेट्रोव्हिएतनामने ओएनजीसीबरोबरच्या कराराची मुदत आणखी दोन वर्षाने वाढविली. त्यामुळे सध्या ओएनजीसी या ब्लॉकमध्ये संशोधन करीत आहे.
मात्र ,चीनने मधेच ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे या क्षेत्रावर दावा करून त्याच्या संशोधन हक्काचा लिलाव मांडला आहे. व्हिएतनाम आणि इतर देश चीनच्या या पवित्र्याबद्दल संतप्त आहेत. या विषयात भारत सरकार काय भूमिका घेते याकडे त्यांचे लक्ष आहे.