
वॉशिंग्टन,१४ जुलै-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मिशेल यांना धमकी देणारा व्हाईट हाऊसमध्ये कार्यरत असलेल्याचीही माहिती समोर आली आहे. व्हाईट हाऊसमध्ये तो एस्कॉर्ट अधिकारी म्हणून काम करीत होता. वॉशिंग्टन डीसी पोलिस या प्रकरणी चौकशी करीत आहे.
