लैला खानचा दुबईतील पती मुंबईत स्थानबद्ध

मुंबई दि.१२- पाकिस्तानी चित्रपट अभिनेत्री लैला खानचा दुबईतील पती सोनू उर्फ वफिखान हा दुबईहून येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच मुंबईच्या गुन्हे शाखेने त्यास स्थानबद्ध केले.  सोनूने इस्लाम धर्माचा स्वीकार केला व टो  वफी खान बनला. दुबईतील अनिवासी भारतीय कमल जधवानींचा तो मुलगा होय.

परवेज तक हा लैला खान व कुटुंबीयांच्या खुनातील मुख्य आरोपी आहे. त्यांने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैलाशी सोनूने विवाह केला आणि कुटुंबीयांसह दुबईला स्थलांतर केले.पोलिसांनी सोनूला अंधेरी येथील तेलीगल्ली कार्यालयात स्थानबद्ध केले व त्याचा जबाब नोंदविला.  लैलाच्या खुनामागे सोनूचा हात आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

चौकशीदरम्यान, सोनू व खुन्यांमध्ये काही संबंध असल्याचे पोलिसांना आढळले नाही.