
लखनौ दि.१३ – उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील पंचायतींने प्रेमविवाह करण्यास बंदी घातली असून तरूण महिलांना मोबाईल वापरण्यासही मनाई केली आहे. इतकेच नव्हे तर महिलांनी एकटेदुकटे घराबाहेर पडण्यावर, डोके उघडे टाकून बाहेर पडण्यावर व ४० वर्षांवरील महिलांना खरेदी करण्यावरही बंधने घालण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हवाई उड्डाण मंत्री अजितसिंग यांच्या मतदारसंघाचा हा भाग आहे.
